Maharashtra news : समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी त्यांच्या कीर्तनात मोबाइलवर शूटिंग करण्यास बंदी घातली आहे. तरीही अनेक जण असे प्रकार करतात.
शिरूर तालुक्यातील एका कार्यक्रमात एक प्रेक्षक असेच मोबाइलवर शूटिंग करीत होता. तेव्हा इंदोरीकर त्याच्यावर चांगलेच भडकले. उगाच TRP साठी दुसऱ्याच्या इज्जती काढू नका, असे सुनावत त्याला मोबाईल बंद करण्यास भाग पाडले.
गेल्या काही काळात युट्यूब चॅनलवरील व्हिडिओमुळे इंदोरीकर महाराज अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांनी यावर बंदी घातली आहे. तरीही असे प्रकार होतात. शिरूरमध्ये एका कार्यक्रमात कीर्तन सुरू असताना अचानक एक व्यक्ती मोबाइलवर शूटिंग करत असताना त्यांनी पाहिले. त्याला त्यांनी कडक शब्दात समज दिली.
यावर बोलताना इंदोरीकर म्हणाले, माझ्या विधानांचा विपर्यास केला जातो. प्रसिद्धीसाठी टीआरपीसाठी मला बदनाम केले जात आहे. माझ्या किर्तनात कोणालाही दुखवण्याचा हेतू नसतो. मी समाज सुधारण्यासाठी आपल्या माणसांना बोलतो.