अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत न्यायालयाने आज त्यांच्याविरोधात प्रोसेस इश्यु केली आहे.
इंदुरीकर महाराजांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यानुसार त्यांना ७ ऑगस्टला कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे.
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात एक दावा केला होता जो त्यांना चांगलाच भोवला आहे.
पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या विधानावरून इंदोरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने इंदोरीकरांना येत्या 7 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
महाराजांना आता स्वत: हजर होत वकीलामार्फत आपली बाजू मांडावी लागणार आहे.निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदुरीकर महाराज हे विशिष्ट शैलीत किर्तन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र सध्या ते न्यायालयीन फे-यात अडकले आहेत.
संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवर संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews