Infinix Zero 5G 2023 : Infinix ‘या’ दिवशी भारतात लॉन्च करणार दमदार स्मार्टफोन, फीचर्ससह जाणून घ्या किंमत

Infinix एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनचे नाव Infinix Note 12i लॉन्च करणार आहे. दरम्यान या स्मार्टफोनचे फीचर्स व किंमत समोर आली आहे.

Infinix Zero 5G 2023 : जर तुम्ही एक नवीन 5G स्मार्टफोन खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Infinix लवकरच भारतात एक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कंपनी 25 जानेवारी 2023 रोजी Infinix Note 12i (Infinix Note 12i Launch India) लाँच करणार आहे. याशिवाय, लवकरच भारतात एक नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याबाबत Infinix Zero 5G (Infinix Zero 5G 2023) च्या लॉन्च तारखेची कंपनीने पुष्टी केली आहे. चला Infinix Zero 5G 2023 ची लॉन्च तारीख, वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या.

Infinix Zero 5G लाँच तारीख भारतात किंमत

Infinix Zero 5G 2023 सीरिज पुढील महिन्यात भारतात लाँच होईल. कंपनीने याची पुष्टी केली आहे की 4 फेब्रुवारी 2023 रोजी Infinix Zero 5G अधिकृतपणे लॉन्च होईल.

हा फोन Zero 5G चा उत्तराधिकारी असेल, ज्याची किंमत सुमारे 20,000 रुपये असू शकते. त्याच्या पांढर्‍या रंगाची पुष्टी झाली आहे. यात कोरल ऑरेंज आणि सबमरीन ब्लॅक रंगाचे पर्यायही असण्याची अपेक्षा आहे.

Infinix Zero 5G 2023 स्पेसिफिकेशन

Infinix चा Zero 5G 2023 आधीच जागतिक स्तरावर लॉन्च झाला आहे. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये FHD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.78-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळू शकतो.

Infinix Zero 5G कॅमेरा आणि बॅटरी

यात 50MP मुख्य लेन्स, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सरसह तिहेरी कॅमेरा प्रणाली दिली जाऊ शकते. सेल्फी घेण्यासाठी समोर 16MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. बॅटरीसाठी, ते 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 5,000mAh बॅटरीसह येऊ शकते.

Infinix Zero 5G 2023 वैशिष्ट्ये

यामध्ये ऑडिओसाठी 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला जाऊ शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 5G, Wi-Fi 6, ब्लूटूथ आणि GPS सपोर्ट मिळू शकतो.