महागाईचा भडका! देशात पेट्रोल – डिझेलचे दर पुन्हा वाढले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- आज पुन्हा तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. 7 जानेवारीला मुंबईत डिझेल 81.07 रुपये आणि पेट्रोलचा रेट 90.83 रुपये आहे.

देशभरात पेट्रोलचे दर 21 ते 24 पैशांपर्यंत आणि डिझेलचे दर 26 ते 29 पैशांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

मुख्य शहरांतील पेट्रोलचे दर :-

दिल्ली : 83.97 रुपये प्रति लीटर

नोएडा : 83.88 रुपये प्रति लीटर

गुरुग्राम : 82.16 रुपये प्रति लीटर

लखनौ : 83.80 रुपये प्रति लीटर

मुंबई : 90.60 रुपये प्रति लीटर

कोलकाता : 85.44 रुपये प्रति लीटर चेन्नई : 86.75 रुपये प्रति लीटर

पाटणा : 86.51 रुपये प्रति लीटर

मुख्य शहरांतील डिझेलचे दर :-

दिल्ली : 74.12 रुपये प्रति लीटर

नोएडा : 74.55 रुपये प्रति लीटर

गुरुग्राम : 74.70 रुपये प्रति लीटर

लखनौ : 74.47 रुपये प्रति लीटर

मुंबई : 80.78 रुपये प्रति लीटर

कोलकाता : 77.70 रुपये प्रति लीटर

चेन्नई : 79.46 रुपये प्रति लीटर

पाटणा : 79.26 रुपये प्रति लीटर

कोविड -19 लसीबद्दल येणाऱ्या सकारात्मक बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडने 54 डॉलर प्रति बॅरल ओलांडला आहे.

तथापि, भारतीय बास्केटच्या कच्च्या तेलाच्या किंमतीवर त्वरित परिणाम होत नाही आणि सुमारे 25 ते 30 दिवसांनंतर ते दिसून येते. परंतु तेल कंपन्यांनी किंमत वाढविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24