जखमी पक्षांना १८वर्षांपासुन मिळत आहे मायेचा आधार.!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पक्षी,ते विविध कारणांमुळे जखमी होत असतात विशेषत:संक्रांतीच्या कालखंडात त्यांचे जखमी होण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले असते. अमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राच्या पुढाकाराने बर्ड हेल्प लाईन चा उपक्रम २००३ सालापासुन सातत्याने राबविला जात आहे.

यावर्षी जखमी पक्षांवर उपचार करून निसर्गात पुन्हा मुक्त करण्यासाठी पक्षीअभ्यासक श्री.जयराम सातपुते यांच्यासह पक्षीमिञ श्री.रूषीकेश परदेशी,दिपक साळवे, प्रतिम ढगे,अमित गायकवाड,शिवकुमार वाघुंबरे,संदिप फंड आदींनी मोलाचे योगदान दिले. यावर्षी १ जानेवारी ते ३० जानेवारी या कालखंडात मांजात अडकुन जखमी झालेल्या  जिल्हाभरातील ३६ पक्षांवर यशस्वी उपचार करून त्यांना निसर्गात मुक्त करण्यात टिमच्या सदस्यांना यश आले. तसेच ५ पक्षी उपचारापुर्वीच मृत झाल्याची माहिती श्री.जयराम सातपुते यांनी दिली.

संक्रांत सणाच्यावेळी मोठ्या प्रमाणावर संक्रांत येते ती पक्षीजीवनावर.स्वत:साठी व आपल्या पिलांसाठी अन्नाच्या शोधात बाहेर पडलेले असंख्य पक्षी या महिनाभरात पतंगाच्या विशेषत:नायलाॅन मांजामुळे घायाळ होवुन मृत्युमुखी पडतात अथवा जखमी होतात.त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी निसर्गप्रेमींच्या बर्ड हेल्पलाईन या उपक्रमामध्ये अनेक नवीन निसर्गप्रेमी जोडले जात आहेत तसेच नागरीकांमध्येही पक्षांबद्दल संवेदनशिलता व जागृकता वाढत आहे.

दरवर्षी नगर जिल्ह्यात निसर्गप्रेमींच्या प्रयत्नाने संक्रांत काळात व पुढेही वर्षभर बर्ड हेल्पलाईनद्वारे जखमी पक्षांवर उपचार केले जातात. १८वर्षापुर्वी सूरू केलेल्या या सातत्यपुर्ण उपक्रमामुळे जखमी पक्षांबाबत नागरिकांमध्ये जागृकता वाढु लागली आहे.यावर्षी अनेक नव्या युवकांनी स्वयंस्फुर्तीने जखमी पक्षांना आमच्यापर्यंत झटपट हस्तांतरीत केल्यामुळे अनेक पक्षांवर वेळेवर उपचार होवुन त्यांचे प्राण वाचु शकले.या कार्यात मोलाचे योगदान दिलेल्या सर्वांना संस्थेतर्फे अभिनंदन प्रमाणपञाने गौरविण्यात येणार आहे. -श्री.जयराम सातपुते.

पक्षीअभ्यासक यावर्षी जखमी पक्षांबाबत निसर्गप्रेमी टिमला कळवण्यासाठी व त्यांना तातडीने टिमपर्यंत पोहचवण्यासाठी श्री.मनोज बावा,मिखाएल शिंदे,शिवम येलुलकर,अशोक कदम,शरद वाघुंबरे,यश चोपडा,जयदिप कुलकर्णी,संदिप कुलकर्णी,निलेश गांधी,अभिषेक हंपे,केतन गोवेकर,भारत अंगीर,मंगेश रेवेकर,सांगेल निरावणे,गणेश पाखरे,अमोल घंगाळे,अक्षय टेमकर,श्रीहरी गोसावी,संतोष उंडे,नितीन पोखरणा,शरद सपाटे,धिरज कराचिवाला,राजकुमार गौतम,प्रविण गार्डे,देव गदादे,रोशन वडकर आदीं जागृक नागरीकांनी मोलाची मदत केली आहे.

शहरी भागात मोठ्या संख्येने निवास करणार्‍या पारवा या पक्षांची संख्या यावर्षीही जखमींमध्ये सर्वाधिक ७ इतकी होती. याबरोबरच एकापाठोपाठ सापडलेले दोन दुर्मिळ चट्टेरीवनघुबड,घार,बगळे, शिक्रा,कापशी घार,शिंजीर,साळुंकी,कावळा,कोकीळ, भारव्दाज,होला,पिंगळा घुबड, पोपट,चिमणी अशा अन्नसाखळीतील महत्वाच्या स्तरांवरील अनेकप्रकारच्या पक्षांना वाचवण्यात कार्यकर्त्यांना यश आले.

झाडांमध्ये अडकलेल्या मांजामुळे संक्रांतीनंतरही पक्षी त्यात अडकल्याच्या घटना घडत राहतात म्हणुनच आपल्या घरपरिसरातील हे धागे बांबुने काढुन टाकण्याचे आवाहनही निसर्गप्रेमी समुहातर्फे करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय पक्षीगणना-2021 उपक्रमास सलग बाराव्या वर्षी सुरूवात झाली असुन या उपक्रमात सहभागी होवु इच्छिणार्‍यांनी 9604074796 वर संपर्क करण्याबाबत आवाहनही करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24