अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- हाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या खात्यांवर अन्याय होत असल्याची भावना महसुल मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाशिक मध्ये व्यक्त केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
स्वर्गीय इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नाशिकला आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
सत्ता स्थापन झाल्या पासून अनेकवेळा शिवसेनेकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचं वारंवार सांगण्यात येत आहे.
एकीकडे महाविकास आघाडी भक्कम असून सत्तेचा कार्यकाळ पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा आत्मविश्वास आघाडीच्या नेत्याना आहे.
काँग्रेसच्या कोट्यात मिळालेल्या खात्यांवर अन्याय होत असल्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही तक्रार केली असून वरिष्ठ पातळीवर देखील चर्चा झाल्याचं थोरात यांनी सांगितले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved