Maharashtra Milk Rates : शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी तोटाच ! दूध उत्पादकांची अवस्था ‘भीक नको, पण कुत्रे आवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Milk Rates : सध्या राज्यातील दूधउत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. शासनाने नवीन अध्यादेश काढून दुधाचे दर ३४ रुपये केले आहेत. त्याचबरोबर खासगी दूध संघ व सरकारी दूधसंघांनी जाचक अटी व शर्ती लागू केल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी तोटाच होणार आहे. त्यामुळे पूर्वीच्या दराप्रमाणेच दुधाला जास्त दर मिळत होता.

आता ३४ रुपये दर केल्याने आणि अटी व शर्ती लागू केल्यामुळे शेतकऱ्यांवर भीक नको पण कुत्रे आवर, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. दर वाढ नको आणि अटी शर्तीही नको, अशीच मानसिकता दुध उत्पादकांची झाली आहे. या सर्व परिस्थितीला शासन जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव डांभे यांनी व्यक्त केली आहे.

पूर्वी दुधाला एसएनएफ कमी लागला तर प्रतिपॉईंट ३० पैसे व फॅट कमी असेल तर प्रति पॉईंट २० पैसे दर कमी मिळत असे. आता एसएनएफ प्रत्येक पॉईंटला १ रुपया व फॅटच्या प्रत्येक पॉईंटला ५० पैसे प्रतिलिटर कमी होणार आहे. त्याचा आर्थिक फटका आताच्या दर वाढीमुळे जास्त प्रमाणात बसणार आहे.

त्यातही शासनाने मध्यंतरी दुधाचा ८ रुपये दर कमी केला होता आणि आता फक्त ३ रुपये वाढवले असून, जाचक अडी व शर्ती लावून शेतकऱ्यांची शासनाने एक प्रकारे फसवणूकच केली आहे.

पशुखाद्याचे दर २५ टक्क्यांनी कमी केलेले नाहीत. सदरचा शासनाचा अध्यादेश म्हणजे दूधउत्पादकांची ठरवून फसवणूक आहे आणि दुध उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.

सरकारने दोन ओळीचा अध्यादेश काढून आपण शेतकऱ्यांचं हित पाहिलं असे दाखवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातून शेतकऱ्यांचा जास्त तोटा होणार आहे. सरकारी व खासगी दुधसंघांनी मनमानी करुन भाव ठरवले, यावर सरकार काय कारवाई करणार, असा प्रश्नही उपस्थित जात केला आहे. दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाच्या दरासंदर्भात कायदा करावा, अशी मागणी अंकुशराव डांभे यांनी केली आहे.