अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- केडगाव रेल्वे उड्डाणपुलावर गुरूवारी रात्री एसटी बस व ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. अश्रू केरु बोबडे (६०, पिंपळगाव आवळा, ता. जामखेड), गणेश शांतीलिंग साखरे (४५, हांडोगिरी, जि. उस्मानाबाद) अशी त्यांचे नावे आहेत.
नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या जामखेड-मुंबई एसटी बसला ( एमएच ११, बीएल ९२३८) नगरच्या दिशेने येणाऱ्या मालमोटारीची (एमएच १६ बीसी १०८९) धडक बसली.
मालमोटारीला धडक बसून दुचाकीस्वार पुलाच्या खाली फेकला गेला. त्यात तरुणाचे दोन्ही पाय निकामी झाले.
अपघात झाल्यानंतर पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे जखमींना नेण्यासाठी येत असलेल्या अॅम्ब्युलन्सला अडथळा येत होता. गर्दीला हटविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत होती.
दरम्यान अपघातस्थळी काही तरुण बसच्या खिडकीतून डोकावून आतमध्ये जखमी आहे का हे पाहून मदत करत होते. तर गर्दीमध्ये उभे असलेले अनेक तरुण अपघातस्थळाचे फोटो, व्हिडीओ मोबाइलवर काढून सोशल मिडीयावर टाकत होते.
अपघातामध्ये अनेक जण मरण पावले आहेत. बसही रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली कोसळून अनेक जण मरण पावल्याच्या अफवा व्हॉट्सअपवर टाकून पसरविण्यात येत होत्या.