डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश ! नेमका काय आहे महाराष्ट्र शासनाचा निर्णय ज्या आधारावर ‘डॅडी’ तुरुंगाबाहेर येईल

Ahmednagarlive24 office
Published:
arun gavali

महाराष्ट्रासाठी विशेषतः मुंबईसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. डॅडी नावाने परिचीत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश आता देण्यात आलेत.

नागपूर खंडपीठाने हे आदेश दिले असून महाराष्ट्र शासनाच्या २००६ च्या शासन निर्णयाच्या आधारे या सुटकेची मागणी केली होती. त्यानंतर आता खंडपीठाने मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिलेत.

अरुण गवळी व त्याचे कारनामे हे सवर्श्रुत आहेत. गवळीवर खंडणी, खून, अपहरण, धमकी अशा विविध प्रकारचे अनेक गुन्हे असून मुंबईत दहशत गाजवणारा डॉन अशी त्याची दहशत होती. दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा लागलेली होती. हे खून प्रकरण २ मार्च २००७ रोजी घडले होते व या प्रकरणी गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

यावेळी आता अरुण गवळी कायमस्वरूपी तुरुंगाच्या बाहेर येण्याची शक्यता असून राज्य शासनाच्या 2006 च्या शासन निर्णयाचा आधार घेत गवळी याने शिक्षेतून सुट देण्याची मागणी केली होती. त्याच्या या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण होऊन हे निर्देश दिलेत. 2006 च्या शासन निर्णयाची मदत घेत तो बाहेर येणार असल्याची माहिती समजली आहे. काय आहे हा शासन निर्णय ते आपण पाहुयात…

काय आहे निर्णय ? कसा झाला फायदा?
जन्मठेपेची शिक्षा जे कैदी भोगत आहेत त्यांना चौदा वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर व त्यांचे वय 65 पेक्षा जास्त झाले असेल तर तुरुंगातून सोडता येईल असा तो निर्णय आहे. आता गवळीच्या बाबतीत जर विचार केला तर त्याचा जन्म 1955 चा असल्याने त्याचे वय सध्या 70 वर्ष आहे.

गेली सोळा वर्ष तो तुरुंगात असल्याने वर्ष 2006 च्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळी पूर्ण करतो असे तरी सध्या दिसते. कोर्टाने गुंड गवळी याची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले असले तरी या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधी देखील दिला असल्याने ते उत्तर आल्यानंतर त्याच्या सुटकेबाबत पुढील कार्यवाही होऊ शकते अशी माहिती समजली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe