शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिरिम निकाल जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत16 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक (इ. 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2020 चा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर झाला आहे.

जिल्ह्यातून या परीक्षेसाठी इयत्ता 5 वीचे 33 हजार 950 व इयत्ता 8 वीचे 21 हजार 477 विदयार्थी बसले होते. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शाळांना आपल्या लॉगिंगमधून व पालकांना आपल्या पाल्याचा निकाल पाल्याचा परीक्षेचा बैठक क्रमांक,

नाव, वडीलांचे नाव, आडनाव व आईचे नाव टाकून एमएससीए पुणे या परिषदेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करुन घ्यावयाची असल्यास

संबंधित शाळांच्या लॉगिंगमध्ये 9 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी 50 शुल्क याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

परीक्षेतील विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम आदी मध्ये दुरुस्तीसाठी 20 ऑक्टोबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिंगमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने कळविण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24