शाळकरी मुलीचे अपहरण करून बलात्कार कारणाऱ्या ‘त्या’ नराधमाची घटनास्थळी नेवून चौकशी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव  तालुक्यातील कोळपेवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कोळपेवाडी येथे काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी फरार होता.

तालुक्यातील शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करणारा नराधम आरोपी अमोल अशोक निमसे (वय १९) याला कोपरगाव पोलिसांनी छत्रपती संभाजी विद्यालय, सुरेगाव, ता. कोपरगाव येथे घटनास्थळी पंचनामा व माहिती घेण्यासाठी नेले.

तालुक्यातील वेळापूर येथील अल्पवयीन मुलीचे शुक्रवारी सायंकाळी अपहरण करून तिच्यावर अमोल अशोक निमसे याने अत्याचार करून १४ डिसेंबर २०१९ पासून आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी जंगजंग पछाडले. परंतु, तो हाती लागत नव्हता.

अखेर पाचव्या दिवशी सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे ऊसतोड करणाऱ्या एका टोळीच्या ठिकाणी तो मिळून आला. आरोपी अमोल निमसे याला येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास न्यायाधीश श्रीमंगले यांनी २४ डिसेंबर २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश केला.

पीडित मुलीवर अत्याचार करून तिला आरोपीने जबर मारहाण करून जखमी करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीच्या अपहरणानंतर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. या आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या चार पथकांच्या तुकड्या कोपरगावच्या दिशेने अहमदनगर येथून रवाना करण्यात आल्या होत्या. तरीही सदर आरोपी हा पोलिसांना हुलकावणी देत होता.

अखेर सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे आरोपी अमोल निमसे याचा ठावठिकाणा मंगळवारी दुपारी ४ वाजता लागल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याच्या रात्री उशिरा मुसक्या आवळल्या.दरम्यान पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरु असून सदर गुन्ह्यात आरोपीला इतर कोणी मदत करणारे आहेत की, आणखी कोणी आहेत काय, याचा तपास पोलीस करीत आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24