अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- सध्या कोरोनाचे नवनवीन विषाणू समोर येत आहेत. हे विषाणू किती घातक आहेत, यासाठी तज्ज्ञ खुलासे करत आहेत. अशातच कोरोनाच्या NeoCoV या व्हेरियंटची लक्षणे समोर आले आहेत.
या विषाणुतून मनुष्याच्या जीवाला अधिक धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अजूनतरी या व्हेरियंटची कोणाला लागण झालेली नसली तरी सर्वसामान्यांने या नवीन प्रकाराची प्रचंड धास्ती आहे.
निओकोव हा शब्द एमइआरएस-कोव (MERS-CoV) शी संबंधित आहे. ग्रीक वर्णमालेतील डेल्टा, ओमिक्रॉन इत्यादींवर आधारित कोरोनाच्या व्हेरिएंटचा सामना केल्यानंतर आता लोकांना या नवीन शब्दाची भीती वाटू लागली आहे.
परंतु हा खरोखरच कोरोनाचा नवीन प्रकार आहे का? की दुसरा कोणता विषाणू आहे ? हे अद्याप समजू शकले नाही. त्यामुळे याबद्दल काळजी करण्याची गरज आहे का? त्याचा संसर्ग घातक ठरू शकतो का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
याबाबत चीनी शास्त्रज्ञांच्या गटाने प्रसिद्ध केलेल्या पीअर रिव्ह्यू अभ्यासाचा भाग NeoCoV शी संबंधित आहे. यातील काही तज्ज्ञ वुहान विद्यापीठातील आहेत.
दरम्यान. MERS-CoV हा 7 प्रकारच्या कोरोना विषाणूंपैकी एक असून मानवांनाही बाधित करु शकतो. 2010 च्या दशकात, सौदी अरेबिया, संयुक्त अरब आणि दक्षिण कोरिया सारख्या देशांमध्ये MERS-CoV चा प्रादुर्भाव पसरला होता.
डब्ल्यूएचओ (WHO)च्या म्हणण्यानुसार, MERS-CoV ने प्रभावित झालेल्या सुमारे 35 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. NeoCoV हा या विशिष्ट कोरोना विषाणूचा संभाव्य प्रकार आहे. तसेच आयएमएचे अध्यक्ष राजीव जयदेवेन यांनी ट्विटरवर सांगितले आहे की, हा कोणताही नवीन कोरोनाचा विषाणू नाही.