महाराष्ट्र

अयोध्येतील भव्य राम मंदिर उद्घाटनासाठी जाताय ? थांबा, घरातून बाहेर पडण्याआधी एकदा वाचाच

Published by
Ahmednagarlive24 Office

Ayodhya Ram Mandir : गेल्या अनेक दशकांपासूनची राम भक्तांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. अखेर तो सुवर्णक्षण जवळ आला आहे. हो, बरोबर विचार करताय तुम्ही, अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिर उद्घाटनाची तारीख आता जवळ येऊ लागली आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 22 जानेवारी 2024 ला प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानावरील भव्य दिव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारतभर प्रभू श्रीरामांच्या मंदिर उद्घाटनाची क्रेज पाहायला मिळत आहे. चहूकडे राममय वातावरण पाहायला मिळत आहे.

अनेक जण राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी जाणार आहेत. राम ललाच्या दर्शनासाठी प्रत्येकच सनातनी उत्साही आहे. 22 जानेवारीच्या या शुभ मुहूर्तावर अनेकजण अयोध्याकडे रवाना होणार आहेत.

जर तुम्ही ही 22 जानेवारीच्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्या नगरीत जाऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. कारण की, जर तुम्ही भव्य-दिव्य राम मंदिर उद्घाटनाच्या मुहूर्तावर अयोध्येत जाण्याचा प्लान बनवत असाल तर तुम्हाला खूपच काळजीपूर्वक आणि विचार करून तुमच्या ट्रीपचे नियोजन करावे लागणार आहे.

कारण की, 22 जानेवारी आणि त्यापूर्वी अयोध्येला जाणार्‍या ट्रेनचे तिकीट किंवा फ्लाइट उपलब्ध होत नाहीये. यामुळे तुम्हाला स्वतःच्या खाजगी वाहनाने अयोध्येला जावे लागणार आहे. तसेच जर तुम्ही स्वतःच्या गाडीने अयोध्येला पोहोचलात तरी तुम्हाला तिथे हॉटेल रूम बुक करावी लागेल.

यासाठी मात्र तुम्हाला हजारो रुपये खर्च करावे लागतील. विशेष म्हणजे हजारो रुपये खर्च करूनही तुम्हाला हॉटेलची रूम मिळणारच हे नक्की नाही. यामुळे कदाचित तुम्ही रामलालाच्या दर्शनासाठी गेलात तर तुम्हाला तुमच्या गाडीतच मुक्काम ठोकावा लागू शकतो. यामुळे प्रभू श्रीरामांच्या भव्य-

दिव्य राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी जर तुम्ही अयोध्येला जाण्याचा तयारीत असाल तर निश्चितच या सर्व गोष्टींचे तुम्हाला आधीच नियोजन करून ठेवावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 20 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत अयोध्येत हॉटेल उपलब्ध नाहीत.

जर एखादी हॉटेल्स उपलब्ध असली तरी त्यांच्या किमती 16 हजार रुपयांपासून ते 75 हजार रुपयांपर्यंत सुरू होत आहेत. यापेक्षा कमी किमतीत हॉटेल्स मिळत असली तरी ती राम मंदिरापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे.

अयोध्येसाठी अनेक गाड्या आहेत, पण 20-21 आणि 22 जानेवारीला जेव्हा राम मंदिराचे उद्घाटन होईल तेव्हा गाड्या पूर्णपणे खचाखच भरलेल्या राहणार आहेत. परिस्थिती अशी आहे की, अनेक रेल्वे गाड्यांमध्ये लांब लचक वेटिंग लिस्ट लागलेली आहे.

Ahmednagarlive24 Office