अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याब राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले. पोस्टमार्टम रिपोर्टमधून सुशांतनं आत्महत्या केल्याचं स्पष्ट आहे.
दरम्यान, आता सुशांतच्या आत्महत्येमागचं कारण फक्त डिप्रेशन नाही तर प्रेम प्रकरण असल्याचं समोर आलं आहे. सुशांत गेले काही महिने डिप्रेशनवरील औषधं घेत नव्हता.
आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवारी रात्री सुशांतने दोन जणांना फोन केला होता. यात त्याची गर्लफ्रेंण्ड मानली जाणारी रिया चक्रवर्ती आणि पवित्रा रिश्तामधील अभिनेता महेश शेट्टी यांचा समावेश आहे.
मात्र या दोघांनीही फोन उचलला नाही. त्यानंतर रविवारी दुपारी 12 वाजता महेश शेट्टीनं सुशांतला पुन्हा फोन लावला, मात्र तोपर्यंत सुशांतचा मृत्यू झाला होता.
सुशांतच्या जवळच्या मित्रानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुशांत आणि रिया यांचे लग्न होणार होते, मात्र लग्नावरून या दोघांमध्ये मतभेद होते.
आता रिया-सुशांत यांच्या दुरावा आल्याचेही बोलले जात आहे. सुशांतनं या काळात अनेक वेळा रियाला फोन केला, मात्र तिनं फोन उचलला नाही. यामुळं सुशांत नाराज आणि रागात होता. यातून त्यानं आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews