अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- देशात १५ वर्षांहून अधिक काळ जुन्या असलेल्या गाड्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
आता सरकारी विभाग आणि PSUs द्वारे खरेदी करण्यात आलेल्या १५ वर्षांहून अधिक जुन्या गाड्या भंगारात काढण्याची नीती लवकरच अधिसुचित केली जाणार आहे. यामुळे १ एप्रिल २०२२ पासून जुनी वाहने स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्क्रॅपेज पॉलिसीला मंजुरी दिली आहे.
नियम लागू करण्याआधी केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठविला जाणार आहेत. तसेच राज्यांकडून सल्ला घेतला जाणार आहे. जुन्या वाहनांमुळे प्रदूषण अधिक होते. यासाठी प्रदूषण कमी करण्यासाठी त्यावर जो खर्च होणार आहे,
त्याचा काही हिस्सा हा जुन्या वाहनांवर कर लावून वसूल केला जावा. या कराला ग्रीन टॅक्सचे नाव देण्यात आले आहे. या पैशांतून पर्यावरण संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.