हे सरकार ५ वर्षे स्थिर राहणे अवघड आहे – खासदार सुजय विखे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- तीनचाकी सरकार चालवण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागते. पाच मिनिटे तीनचाकी रिक्षा चालवण्याचा मी अनुभव घेतला आहे. हे सरकार ५ वर्षे स्थिर राहणे अवघड आहे.

राज्य सरकारने दूध दरवाढीबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. पिकांच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत, अशी टीका खासदार डाॅ. विखे यांनी केली. खासदार असलोे, तरी मी डॉक्टरही आहे.

कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी मी प्रशासनाला काही सूचना केल्या होत्या. तथापि, माझे ऐकून घेतले जात नाही. अधिकारी अनियंत्रित पद्धतीने काम करतात. त्यामुळे खासदार, आमदार होण्यात यापुढे रस दाखवणार नाही.

अधिकाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन निवडणुका लढवाव्यात. आम्ही देखील खासदारकी सोडून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतो.लवकरच पंतप्रधानांना भेटून ही कैैफियत मांडणार आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

आमदार राधाकृष्ण विखेंच्या सहकार्याने बुधवारी श्रीरामपुरात डॉ. विखे फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना चाचणी नमुना संकलन केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना खासदार विखे बोलत होते.

पंचायत समिती सभापती संगीता शिंदे, दीपक पटारे, नानासाहेब पवार, शरद नवले, प्रकाश चित्ते, मुक्तार शहा, केतन खोरे, प्रा‍ताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24