2020 हे नवे वर्ष सुरु होण्यास आता तीनच दिवस राहिले आहेत नव्या वर्षात बरेच नवीन बदल होणार आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. आपण या बदलांविषयी जागरूक असले पाहिजे म्हणूनच या बातमीमध्ये आम्ही नवीन वर्षातील काही महत्त्वपूर्ण बदलांविषयी सांगत आहोत.
स्टेट बँक मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड :- तुमचे खाते तर स्टेट बँक ऑफ इंडियात असेल तर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे जर तुम्ही आतापर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाचे जुने ATM कार्ड बदलले नसेल तर ते बदला, ते बदलण्याची शेवटची संधी 31 डिसेंबरपर्यंत आहे. हे कार्ड 1 जानेवारी 2020 पासून कार्य करणार नाही. कार्ड बदलून घेण्याची ही प्रक्रिया सध्या विनामूल्य आहे.
पॅन कार्ड व आधार लिंक :- आपल्या पॅन कार्डला आधारशी लिंक करा, 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. जर तुम्ही हे केल नाही तर तुमचे पॅनकार्ड निरुपयोगी होईल, आणि आर्थिक व्यवहार करण्यात तुम्हाला अडथळे येतील.तुम्ही हे केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड इन-ऑपरेटीव्ह होईल. याचाच अर्थ पॅनकार्डाद्वारे तुम्ही आर्थिक देवाण-घेवाण करू शकणार नाही.
जीएसटी नोंदणी :- जीएसटी नोंदणी सुलभ करण्यासाठी, आधारद्वारे जीएसटी रिटर्न नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन जीएसटी रिटर्न भरण्याची प्रणाली 1 जानेवारी 2020 पासून अंमलात येईल.
एनईएफटी व्यवहार विनामूल्य :- होय ! 1 जानेवारी, 2020 पासून, ग्राहकांना बँकांकडून एनईएफटीद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कोणतीही फी देण्याची आवश्यकता नाही. 16 डिसेंबरपासून 24 तास एनईएफटी व्यवहार सेवा सुरू करण्यात आली आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग :- वित्तीय वर्ष २०१८-१९ साठी बिलेटेड इनकम टॅक्स रिटर्न १ मार्च २०२० पर्यंत फाइल केला जाऊ शकतो. परंतु, ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न फाइल केल्यास लेट फी कमी भरावी लागेल. तारीख वाढल्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत रिटर्न फाइल केल्यास कोणतेही फाइन लागणार नाही. ३१ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न फाइल केल्यास ५००० रुपये दंड भरावा लागेल.