शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल भावात देण्याची आली वेळ !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-  कौठा परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. यात कपाशीचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घटले. मात्र, जो थोडाफार कापूस उपलब्ध आहे.

त्याला शासनाचा हमीभाव मिळत नसल्याने दिवाळीच्या तोंडावर काही कापूस विक्रीसाठी जात आहे. याला सरकारने ५८०० रुपये हमीभाव जाहीर केला.

मात्र, शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल भावात देण्याची वेळ आली आहे. यावर्षी कौठा परिसरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे खरीप पूर्ण गेला.

अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांकडे असलेल्या कापसाला शासनाचा हमीभाव नाही. सरकारने या वर्षासाठी ५८०० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला. मात्र, शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू नाही.

कापसाला चांगला भाव मिळत नाही. खासगी व्यापाऱ्यांकडून ४६०० ते ४६५० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नाही. यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24