महाराष्ट्र

लग्नमंडपात फटाके फोडणे पडले महागात; आग लागून २५ दुचाकी जळून खाक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या अंसारी मॅरेज हॉल मध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली.

या आगीत २० ते २५ दुचाकी वाहने जळाली असून अग्निशमनदलाच्या अथक प्रयत्नांनी दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले आहे. या हॉल परिसरात फटाके फोडण्यात आले होते. या फटाक्यांमुळे लग्न मंडपाला आग लागल्याचं समजते आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि , भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरातील अन्सारी मॅरेज हॉलमध्ये रविवारी रात्री लग्नसमारंभ सुरू होता. यादरम्यान पार्किंगच्या मोकळ्या जागेत फटाके फोडण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करताना अचानक मंडपाला आग लागली.

हळूहळू ही आग पसरून पार्किंगमधील वाहनांना लागली. या आगीत सुमारे २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्याचे समजते आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही.

अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली आहे. भिवंडीत मोकळ्या जागेत अनेक व्यावसायिकांनी अशा प्रकारे मॅरेज हॉल थाटले आहेत.

मात्र सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने भविष्यात जीवितहानी होण्याची मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येतआहे.

Ahmednagarlive24 Office