जिल्ह्यातील या गावात आजपासून जनता कर्फ्यु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   अकोले – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी पाहून प्रशासनाला चांगलाच घाम फुटला आहे.

वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच जिल्ह्यात दररोज मृतांच्या आकडेवारी मध्ये देखील वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाने आजही थैमान घातले असून आज अकोल्यातील राजूर येथे 66 संशयित रुग्णांची तपासणी केली होती.

त्यात राजुरमध्ये 18 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. तेव्हा आता तरी राजुरकरांनी बेफिकीर राहून चालणार नाही. आपली काळजी घ्यावी, गर्दी टाळावी, सुरक्षित अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, अकोले तालुक्याची रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. आता राजूर मध्ये एकूण रुग्ण संख्या 22 झाली आहे ..!

राजूर येथील ग्रामीण रुग्णालयातील रॉपीड अँन्टीजन टेस्ट अहवालात 18 जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला. त्यात एकट्या राजूरमध्ये 69 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 17 पुरुष, 21 वर्षीय तरुणी,25 वर्षीय तरुणी, 33 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला,

17 वर्षीय तरुणी, 30 वर्षीय तरुणी, 22 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा, 5 वर्षीय मुलगा, दोन 5 वर्षीय मुले, 12 वर्षीय मुलगी अशा एकूण 18 जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. अशी माहिती ग्रामीण रुग्णालय राजूर येथील डॉ. दिघे यांनी दिली.

तरीही राजूर मध्ये अजूनही सोशल डिस्टस ठेवला जात नाही, आता खऱ्या अर्थाने राजूर येथे कोरोना पेशन्ट निघण्यास सुरुवात झाली आहे. राजूर मध्ये 5 सप्टेंबर पासून 5 दिवस जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. इथून पुढे राजूर गाव पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे

. फक्त अत्यावश्यक सेवा सोडता सर्व दुकाने बंद राहतील. राजूर करानो सावधान काळजी घ्या …!विनाकारण बाहेर फिरू नका…!घरी रहा… सुरक्षित रहा..! असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24