अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- अलिबाग येथील जंजिरा किल्ला जलदुर्गांमध्ये प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध जंजिरा किल्ला आजपासून जानेवारीपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. किल्ला बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जरी केले आहेत.
कोरोना रोगाच्या नवीन साथीमुळे हे पाऊल उचलला असल्याची माहिती मिळत आहे. नाताळची सुट्टी,शनिवार आणि रविवार या सलग सुट्या आणि नववर्षाचे स्वागत करताना रायगड जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी होत असते.
अलिबाग,मुरुड आणि श्रीवर्धनमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. जिल्ह्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी मुरुड बीच आणि जंजिरा किल्ला हे कायम आकर्षण राहिले आहेत.
अशा परिस्थिती जंजिरावरची गर्दी नियंत्रणात ठेवायची तर किल्ला बंद ठेवण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा ,
गर्दी झाल्यास कायंदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात राहावे म्हणून किल्ला बंद ठेवण्यात येईल.दरम्यान नियमांचे पालन न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.