Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांच्या श्रीरामपूर येथील सभेप्रसंगी येथील चित्रकार रवी भागवत यांनी जरांगे पाटील यांचे ५४ चौरस फुटांचे चित्र हजारो श्रोत्यांसमोर साकारले. हे चित्र पाहून जरांगे पाटील भारावून गेले.
जरांगे पाटलांच्या स्वागताची तयारी अनेक दिवसांपासून शहरात सुरू होती. या स्वागताचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाजाचे नितीन पटारे यांच्या पुढाकारातून चित्रकार भागवत यांनी ६ बाय ९ आकाराची कॅनव्हास फ्रेम तयार केली.
कार्यक्रमस्थळी हे चित्र साकारण्याचे ठरले. त्याप्रमाणे सायंकाळी ७ वाजता हजारो श्रोत्यांच्यासमोर भागवत यांनी चित्र रेखाटण्यास प्रारंभ केला. अॅक्रेलिक रंगाच्या सहाय्याने सुमा तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर मनोज जरांग यांची
सरकारला इशारा देणारी छबी भागवत यांनी कॅनव्हॉसवर चित्रित केली निवेदक संतोष मते व कवी बाबासाहेब सौदागर यांनी भागवत यांचा परिचय उपस्थितांना करून दिला जरांगे पाटील यांच्या समवेत अंतरवली येथून आलेल्या टीमचे नेतृत्त्व करणारे प्रदिप सोळुंके चित्र पाहून भारावले.
त्यांनी चित्राचे कौतुक करून भागवत यांच्या पाठिवर शाबासकीची थाप टाकली. जरांगे पाटील सभास्थानी येताच त्यांनीही भागवत यांची भेट घेऊन चित्र पाहिले श्रीरामपूरकरांच्या वतीने झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागताचा त्यांनी हात जोडून हसतमुखाने स्वीकार केला
व चित्राचे व भागवत यांचे कौतूक केले यावेळी पत्रकार बाळासाहेब आगे, नितीन पटारे, माजी नगरसेवक संजय गांगड, संदिप चोरगे, राहूल उंडे आदी उपस्थित होते.