Jetour Traveller SUV : जर तुम्ही एका आलिशान कारचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता बाजारात कमी किमतीत लँड रोव्हर कार लॉन्च होणार आहे.
चिनी कंपनीने लँड रोव्हर डिफेंडर एसयूव्हीची डुप्लिकेट तयार केली आहे. या SUV ला Jetour Traveller असे नाव देण्यात आले आहे. चेरी ही चीनमधील लोकप्रिय ऑटो उत्पादक कंपनी आहे, ज्याने ही कार सादर केली आहे. त्याची रचना तुम्हाला लँड रोव्हर डिफेंडरची आठवण करून देईल.
डिझाइन
इतर SUV प्रमाणे, Jetour ट्रॅव्हलर देखील लैडर-ऑन-फ्रेमवर तयार केली आहे. एसयूव्हीच्या फ्रंट-एंडची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे.
हेडलॅम्पची रचना चौकोनी असली तरी लाइट्सची रचना वेगळी आहे. बोनेट, व्हील आर्च आणि फेंडरला लँड रोव्हर डिफेंडरसारखे डिझाइन मिळते.
एसयूव्हीचे साइड प्रोफाइल बॉक्सी आहे आणि तेथूनच डिफेंडरची भावना येते. मागील क्वार्टर ग्लासची रचना डिफेंडरपेक्षा वेगळी आहे. एसयूव्हीमध्ये मोठ्या आकाराचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत.
मागील बाजूस, स्पेअर व्हील टेलगेटवर बसविले गेले आहे आणि टेललाइट्स डिफेंडरप्रमाणेच उभ्या ठेवल्या आहेत. ही एक 5-डोर एसयूव्ही आहे आणि लँड रोव्हर डिफेंडर 110 सारखी दिसते.
इंजिन आणि पॉवर
चेरी जेटूर ट्रॅव्हलरला टर्बो-पेट्रोल, पेट्रोल-हायब्रिड आणि प्लग-इन हायब्रिड ईव्ही आवृत्त्यांसह ऑफर केले जाईल. एसयूव्हीमध्ये 1.6 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन वापरले जाऊ शकते.
हे इंजिन 7-स्पीड DCT गिअरबॉक्ससह जोडले जाईल. पेट्रोल हायब्रीड आवृत्ती 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन वापरेल. PHEV आवृत्तीमध्ये 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. SUV चे सर्व प्रकार 4WD सह ऑफर केले जातील.