जिओचा ग्राहकांना दणका,ही सुविधा केली बंद !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :- अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड इंटरनेट डेटा देणाऱ्या रिलायन्स जिओनं ग्राहकांना दणका दिला आहे.

जिओच्या पोर्टफोलियोमध्ये सर्वांत जास्त चर्चित 1.5 जीबी डेटा दररोज आणि 2 जीबी डेटा दररोज असा प्लान आहे. जिओच्या पोर्टफोलियोमध्ये काही अन्य प्लान देखील आहेत. ज्यातून काहींमध्ये जिओ टॉक टाइम देते. जिओनं ग्राहकांना आणखी एक झटका दिला आहे. ज्याच्या अंतर्गत आता जिओ ग्राहकांना फुल टॉक टाइम मिळणार नाही आहे. 

जिओच्या पोर्टफोलियोमध्ये 10 रूपयांपासून 1000 रूपयांपर्यंत टॉक टाइम प्लान मिळतो. याआधी या प्लानमध्ये फुल टॉक टाइम मिळत होता. जो आता मिळत नाही आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आययूसी चार्ज लागू करण्यासोबतच कंपनीनं फुल टॉक टाइमचा लाभ बंद केला आहे. 

10 रूपयांच्या टॉक टाइम रिचार्जवर जिओ 7.47 रूपयांचा टॉक टाइम देत आहे. 20 रूपयांच्या रिचार्जवर कंपनी 14.95 रूपयांचा, 50 रूपयांच्या रिचार्जवर 39.37 रूपयांचा टॉक टाइम, 100 रूपयांच्या रिचार्जवर 81.75 रूपयांचा टॉक टाइम, 500 रूपयांच्या रिचार्जवर 420.73 रूपयांचा टॉक टाइम आणि 1000 रूपयांच्या टॉक टाइमवर 844.46 रूपयांचा टॉक टाइम मिळणार आहे.

दुसरीकडे हे ध्यानात ठेवा की, रिलायन्स जिओच्या चर्चित डेटा प्लान देखील आता आययूसी टॉक टाइम व्हॉउचरसोबत मिळत आहे. प्रीपेड यूजर्स आपल्या सुविधेनुसार आययूसी रिचार्ज निवडू शकता.

अहमदनगर लाईव्ह 24