अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ठाकरे सरकारच्या १० रुपयांत शिवथाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात करण्यात आली. मात्र या योजनेच्या पहिल्याच दिवशी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना टीका सहन करावी लागली आहे.jitendra-awhad
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याही हस्ते शिवभोजन उदघाटन करण्यात आले. या उदघाटनावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी आव्हाडांवर टीका केली आहे.
अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाडांचा एक फोटो ट्विट करत लिहले कि, 10 रुपयाच्या थाळीसोबत 20 रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस!, अशी टीका केली आहे.
शिवथाळी योजनेचा शुभारंभ केल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः या थाळीचा आस्वाद घेतला. मात्र त्यावेळी त्यांच्यासोबत १५ रुपयांची पाण्याची बाटलीही होती.
त्यामुळे १० रुपयांच्या शिवथाळीसोबत १५ रुपयांची पाण्याची बाटलीही गरिबांना मोफत मिळणार का ? असा सवाल विचारत, नेटिझन्सनी जितेंद्र आव्हाडांना टार्गेट केलं.
फोटोमध्ये पाहू शकता की, जितेंद्र आव्हाड हे शिवथाळी उद्धाटनावेळी जेवत असताना त्या टेबलवर बिसलेरी पाण्याची बॉटल ठेवण्यात आली आहे. याच मुद्द्यावर बोट ठेवून मनसेनं आव्हाडांवर विखारी टीका केली आहे.
दरम्यान शिवभोजन योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 11,274 थाळींची विक्री झाली आहे. तर सर्वाधिक विक्री ठाणे आणि नाशिक या भागांमध्ये झाली आहे.
सध्या राज्यात 125 केंद्रांवर शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे. या थाळीमध्ये 30 ग्रॅमच्या 2 चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅम भात आणि 100 ग्रॅम एक वाटी वरण समाविष्ट करण्यात आले आहे.