अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था हा नित्याचाच भाग झाला आहे. अनेक आंदोलने या रस्त्यांसाठी होत असतात. परंतु हि परिस्थिती मात्र बदलताना दिसत नाही.
राहुरी मतदारसंघामधील मानोरी येथील रस्त्याचीही अशीच दुरवस्था झाली आहे. परंतु या रस्त्याच्या अशा अवस्थेवरून मंत्री तनपुरे व माजी आ. शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
या रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करून विखे-कर्डिले समर्थकांनी आंदोलन केले. तर तनपुरे समर्थकांनी या रस्त्याला माजी आ. कर्डीले यांचा आजवरचा उदासीन कारभार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
राहुरी-श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाला जोडणाऱ्या मानोरी-महाडुक सेंटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तम आढाव, बाळासाहेब आढाव, उत्तम खुळे, शिवाजी थोरात,
श्याम आढाव आदींनी या रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण केले. कर्डिले यांनी वर्षापूर्वी रस्त्याचे भूमिपूजन केले. परंतु, अजून काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,
खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार लहू कानडे, खासदार सदाशिव लोखंडे यांना या परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला.
तनपुरे समर्थकांनी या आंदोलनाची खिल्ली उडवली. पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, डॉ. राजेंद्र पोटे, डॉ. बाबा आढाव, नवनाथ थोरात, वसंत आढाव, बाबासाहेब पिले, विलास थोरात आदींनी निषेध केला.
कर्डिले यांनी फक्त भूमिपूजन केले. काम केले नाही. त्यांचा 10 वर्षांचा निष्क्रिय कारभारच रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असल्याचा आरोप तनपुरे समर्थकांनी केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved