महाराष्ट्र

पुणे सत्र न्यायालयाकडून कालीचरणला इतक्या दिवसांची पोलीस कोठडी !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराजाला(Kalicharan maharaj) अटक केल्यानंतर आज पुणे पोलीसांनी त्याला आज पुणे सत्र न्यायालयात हजर केले असता

त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कालीचरण महाराजासोबत धार्मिक भावना भडकावल्याबद्दल पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय.

महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराजाला अटक झाली होती. दोन समाजात तेढ निर्माण करून भडकाऊ भाषण केल्याच्या कारणावरून पुणे पोलीसांनी कालीचरण महाराजाला रायपूरमधून ताब्यात घेतले.

आज दुपारी पुणे पोलीसांनी त्यांना सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

19 डिसेंबरला पुण्यातील नातूबागेत झालेल्या कार्यक्रमात भडकाऊ भाषण केले नातूबागेत झालेल्या कार्यक्रमात भडकाऊ भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी कालिचरणवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.

या प्रकरणातील मिलिंद एकबोटे, रमाकांत एकबोटे, दिपक नागपुरे, मोहन शेटे आणि कॅप्टन दिगेंद्र कुमार हे आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी कालीचरणची कोठडी आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं.

त्याचबरोबर कालीचरण महाराजाचे व्हॉईस सॅम्पल घ्यायचे आहेत आणि इतर आरोपींसोबत मिळून कालीचरणचा दंगल भडकावण्याचा प्रयत्न होता का याचीही तपासणी करायची आहे असं पोलीसांनी न्यायालयात सांगितलंय.

कल्याणमध्येही कालीचरण बाबा विरोधात गुन्हा दाखल कल्याणमधील एका खाजगी संस्थेच्या कार्यक्रमात 10 डिसेंबर रोजी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी कालीचरण बाबाने वादग्रस्त विधान केले होते.

याप्रकरणी मंगळवारी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबाच्या विरोधात अजामिनपात्र गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office