अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून अनेक मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेले कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे.
त्यामुळे पर्यटकांनी येथे येण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन देवस्थान व ग्रामपंचायत यांच्या वतीने केले आहे. भंडारदरा हे पर्यटनस्थळ नेहमी पर्यटकांनी गजबजलेले असते.
परंतु तेसुद्धा बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई शिखरावर गिर्यारोहण करण्यासाठी पर्यटकांची वर्दळ असते. परंतु या परिस्थितीत पर्यटकांना यंदी असताना काही अटी शिथिल करण्यात आल्यामुळे काही पर्यटक येण्याचा प्रयत्न करतात.
आतापर्यंत हा परिसर सुरक्षित असून येणाऱ्या पर्यटकांपासून कोणताही धोका होऊ नये, म्हणून ग्रामस्थांनी पर्यटकांना विरोध दर्शविला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews