अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अहमदनगरजिल्हाही याला पावड नाही. त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे अहमदनगर इथे आले होते.
यावेळी बोलताना त्यांनी कंगना रणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली. अभिनेत्री कंगना यांनी मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानबाबत शिवसेना मंत्री भुसे यांना विचारले असता ते म्हणाले, कंगना राणावतचा विषय गांभीर्याने घेण्यासारखा नाही.
जनतेला सर्व काही समजते, जनता जनार्दन अशा गोष्टींना किंमत देत नाही. जो महाराष्ट्राच्या मातीत राहतो, महाराष्ट्राच्या मातीमधील अन्न खातो आणि महाराष्ट्रातील पोलिसांच्या प्रति शंका व्यक्त करतो. पाकिस्तान व्याप्त काश्मीरची मुंबईशी तुलना करतो, अशांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, अशी मागणी मंत्री भुसे यांनी केली.
दरम्यान, पिकांबाबत बोलताना ते म्हणाले, राज्यामध्ये काही भागात जादा पाऊस झाल्यामुळे मूग, तूर, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून वस्तूदर्शी पंचनामे आल्यानंतर मदत करण्याबाबत पुढील कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान पाठीमागच्या काळात बोगस बियांना बाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या. शासन पातळीवर 80 ते 90 टक्के त्याची पडताळणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी जे काही बियाणे उगवले नाही, ते बदलून देण्याची सूचना सरकारने केली होती.
काही ठिकाणी जी बियाण्यांची रक्कम होती, त्याची भरपाई करण्याची कारवाई करण्यात आली असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
* काय म्हणाली होती कंगना ? :- ‘मला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते’ असे कंगना म्हणाली होती. यावर भाजप आमदार राम कदम यांनी तिला मुंबई पोलीस चांगले असल्याचे सांगत आश्वस्त केले होते. परंतु, पोलीस महाविकासआघाडी सरकारच्या दबावाखाली असल्याचे राम कदम यांचे म्हणणे होते.
यानंतर कंगना राणौतने तात्काळ राम कदम यांच्या ट्विटला रिप्लाय देत माझा मुंबई पोलिसांवर विश्वास नसून मला थेट केंद्र सरकार किंवा हिमाचल प्रदेश पोलिसांकडून सुरक्षा मिळाली तर बरे होईल, असे कंगनाने म्हटले होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved