केडगावच्या विकासाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर :- राजकारण स्वत:साठी नव्हे तर जनतेच्या विकास व कल्याणासाठी केले जाते. केडगाव उपनगर विकासापासून वंचित होते.

येथील जनतेला सुख-सुविधा निर्माण करुन देणे हे पहिल्यापासून शिवसेनेचे स्वप्न होते. केडगावच्या विकासाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

येथील दादागिरी संपुष्टात येऊन, शिवसेनेच्या माध्यमातून विकासाला गती मिळाली आहे.

तर सर्वसामान्य नागरिक भयमुक्तीने वावरत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केले.

केडगाव मधील एकनाथनगर परिसरात स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नाने महापालिकेच्या माध्यमातून बंद पाईप गटार व ड्रेनेजलाईन कामाचा शुभारंभ करताना राठोड बोलत होते.

याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, नगरसेविका सुनिता कोतकर, शांताबाई शिंदे,

प्रतिभा दारकुंडे, अलका दारकुंडे, मीना येणारे, रत्ना सरोदे, सुनिता कोहक, रेशमा पठाण, लक्ष्मी परबंडोळे आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राठोड म्हणाले, नागरिकांनी आपले प्रश्न नि:संकोचपणे आपल्या नगरसेवकाला सांगितले पाहिजेत. अर्ध्या रात्री देखील नागरिकांच्या कामासाठी मी हजर राहत असतो.

केडगावची परिस्थिती बदलत असून, सर्वसामान्य जनतेचा विकास केंद्रबिंदू मानून शिवसेनेचे नगरसेवक आपले कार्य करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24