अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांना राष्ट्रवादीने फोडले, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर शिंदे कर्जत येथे पत्रकारांशी बोलत होते. ‘खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर कोणतीही भरतीओहटी येणार नाही,’ असा दावाही त्यांनी केला आहे.
‘सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. त्याप्रकरणी एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना ते प्रमुख साक्षीदार होते. आता ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे.
त्यामुळेच एकनाथ खडसे यांना प्रवेश देत त्यातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केलाय,’ असा घणाघाती आरोप भाजप नेते व माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान त्यांनी आ. रोहित पवार यांच्यावरही घणाघात केला. ते म्हणाले आतापर्यंतच्या काळात त्यांनी उल्लेख करावा असे एकही भरीव काम केले नाही.
उलट बारामती भागातील आपल्या कंपन्या व संस्थांच्या वस्तू येथे आणून विकण्याचा व्यापारच वाढविला, येथे सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी बारामती भागातील कंपन्या आणि
संस्थांचा विविध प्रकारचा माल येथे आणून विकण्यास सुरुवात केली आहे. कोंबड्यांची पिल्ले, पिठाच्या गिरण्या, स्वत: च्या नावाचे मास्क, झाडांची रोपे, माशांची बिजे अशा अनेक वस्तू येथे आणून विकल्या जात आहेत.
एकवेळ हे करण्यास हरकत नाही. मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करण्याचेही कर्तव्य असते, हे लक्षात ठेवले पाहिजे.’
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved