नगर शहरातून किरण काळे यांनी दिली मुलाखत,उमेदवारीवर ठोस दावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज पक्ष श्रेष्ठींसमोर नगर शहरातून आक्रमकपणे उमेदवारी मागितली. पक्षाचे प्रभारी आ. दिलीप वळसे पाटील, निरीक्षक अंकुश काकडे, माजी खा. देविदास पिंगळे यांच्या समोर काळे यांनी नगर शहरातील पक्षाच्या सद्यस्थितीचा पाढाच वाचला.

विद्यमान आ. संग्राम जगताप यांनी आजच्या मुलाखती कडे पाठ फिरवली. त्यांच्या उमेदवारीची मागणी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली. यामुळे शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. 

दरम्यान माजी महापौर अभिषेक कळमकर यांनीही पारनेर विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी मागितली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील राजकीय पट काय असेल याची उत्सुकता नगरकरांना लागली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24