अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- भाजप नेते किरीट सोमय्या धमकीच्या फोन कॉलने हैराण झाले आहेत. सोमय्या यांना गेल्या दोन दिवसांपासून सहावेळा वेगवेगळ्या क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्यांचे फोन येत आहेत.
सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना पत्र लिहून त्यांनी तक्रार केली आहे. सोमय्या यांनी या तक्रारी सोबत काही फोन क्रमांक जोडले आहेत.
या फोनवरील व्यक्तीनी त्यांना सहा गोळ्या डोक्यात घालून मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, आज सकाळी ११.३० वाजता आणखी दोनदा धमकीचे फोन आले.
सर्व सहा बुलेट्स तुझा डोक्यात घालणार किरीट सोमैया …..असे यावेळी धमकाविण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे. गेल्या दोन दिवसात अर्धा डझनहून अधिक “धमकी” फोन कॉल आले असल्याचे सोमय्यांनी सांगीतले.