पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने हत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोपरगाव : तालुक्यातील वारी परिसरातील खोलवाट वस्ती येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती अमोल मारुती बोर्डे याने पत्नी सविता अमोल बोर्डे (वय २७ ) हिच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

मयत तरुणीच्या भावाने दाखल फिर्यादीनुसार आरोपी पतीच्या विरुद्ध पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी मयतेचा भाऊ भानुदास मल्हारी मोरे (रा .राजनगाव ता .चाळीसगाव जि.जळगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले कि ,गेल्या एक वर्षापासून माझे दाजी अमोल बोर्डे हे माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत होते.

माझी बहिण राहत असलेल्या गल्लीत शेजारच्या लोकांशी बोलताना आढळल्यास तू परपुरुषाशी कशाला बोलतेस तुझे त्यांच्याशी काहीतरी संबंध आहे .असे हाणून पाडून बोलत व सतत मारहान करीत होते.

याच कारणावरून माझे दाजी व बहिण यांच्यात रविवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास झालेल्या भांडणात दाजी अमोल यांनी

माझी बहिण हिच्या उजव्या कानाच्यावर डोक्यात ,मानेवर व डाव्या हाताच्या मनगटावर कुऱ्हाडीने घाव घातले असल्याचे तिचे प्रेत शवविच्छेदनासाठी शिर्डी येथे ठेवलेले असताना मी सोमवारी प्रत्यक्षात बघितल्या नंतर लक्षात आले .

घडलेल्या घटनेविषयी सविताचे भाये भास्कर मारुती बोर्डे यांना विचाले असता त्यांनी झालेल्या सर्व घटनेविषयी मला माहिती दिली असे भानुदास मोरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान मयत सविता हिच्यावर सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात अत्यंसंस्कार करण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24