बाधित कर्मचाऱ्यांमुळे ग्रामपंचायतीला टाळे ठोकले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  मिशन बिगेन अंतर्गत राज्यात लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असल्याने सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

जिल्हयासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून नगर तालुक्यातील नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत आजपर्यंत सुमारे १७५ कोरोना रुग्ण आढळले आहेत.

त्यात ग्रामपंचायतच्या दोन कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीतील इतर सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालयही काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.

कोरोनाची साखळी रोखण्यासाठी नवनागापूर ग्रामपंचायतीने विविध उपाययोजना राबविल्या असून, याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (दि.१०) गावात कोरोना तपासणी मोहिम राबविण्यात आली.

आरोग्य विभागाच्या वतीने ६७ लोकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये दोन ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह ९ जण बाधित आढळून आले.

कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय सोमवारपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24