अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपणास शिकवलेला स्वाभिमान प्रत्येकाने आपापल्या मनात जागृत ठेवून प्रत्येक शिवसैनिकाने स्व. ठाकरे यांचे आचार- विचार व संस्कार यावर वाटचाल करावी, असे प्रतिपादन राहाता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पठारे यांनी केले.
स्व. ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पठारे बोलत होते. राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व राहाता नगरपरिषद येथे स्व. ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक माजी नगरसेवक व शिवसैनिक राजेंद्र अग्रवाल यांनी केले.
यावेळी भागवत आरणे, नगरसेवक साहेबराव निधाने, माजी उपनगराध्यक्ष धनंजय गाडेकर, रामनाथ सदाफळ, बाळासाहेब गिधाड, प्रदीप बनसोडे, इलियास शाह, रावसाहेब बोठे, मोहनराव सदाफळ, शशिकांत लोळगे, भागुनाथ गाडेकर, राजेश लुटे आदींनी मनोगत व्यक्त करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय शिंदे, नगरसेवक निवृत्ती गाडेकर, नगरसेवक भीमराज निकाळे, नगरसेवक सागर लुटे, दशरथ तुपे, सुनिल बोठे, बाळासाहेब सदाफळ, दीपक सोळंकी, सुनिल परदेशी, विठ्ठल पवार, हेमंतकुमार सदाफळ, नितीन सदाफळ,
भगवानराव टिळेकर, माऊली गाडेकर, मुश्ताक शाह, इरफान शेख, समिर बेग, मुन्ना फिटर, संतोष लोंढे, दत्तुभाऊ गाडेकर, शाहरुख बागवान, हरिभाऊ गाडेकर, दशरथ गव्हाणे, गणेश जाधव,
अविनाश सनांसे, देवीदास दळवी, दत्तुभाऊ सदाफळ, संदिप जेजुरकर, दिलीप घोडेकर, बंटी तुपे, पोपट तुपे, पांडुरंग तुपे, गणेश निकाळे, अतुल लावर, मयुर आमकर, सार्थक कुंभकर्ण यांच्यासह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.