शासन विविध योजना आणत असते. यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी योजनांचा लाभ समाविष्ठ आहे. विविध सामाजिक स्तरांसाठी देखील शासन विविध योजना आखत असते.
आता शासनाने ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प’ योजना आणली आहे. यामध्ये मोडी लिपीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे हे प्रशिक्षण घेता घेताच दहा हजार रुपये विद्यावेतनही मिळणार आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्यावतीने मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.
कोण घेऊ शकते लाभ ?
‘सारथी’च्या वेबसाईटला भेट देऊन अर्जाबाबत माहिती मिळेल. तेथे जाऊन अर्ज करता येणार आहे. यासाठी काही निकष असून उमेदवार मराठी, कुणबी असावा. तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. नॉन क्रिमिलेअर असणे गरजेचे आहे.
सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र असावे. जातीचे प्रमाणपत्र नसल्यास ईडब्ल्यूएस किवा एसईबीसी प्रमाणपत्र असावे. उमेदवाराचा जन्माचा दाखला किवा दहावीचे प्रमाणपत्र जोडावे.
महिन्याला दहा हजारांचे विद्यावेतन
प्रशिक्षणासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांसाठी प्रतिमहिना १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्यात येणार आहे. सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २ महिन्यांचा ६० ऑनलाइन तासांचा हा अभ्यासक्रम आहे. यात मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
नेमका काय आहे योजनेचा उद्देश
शाहू महाराजांच्या काळातील कोल्हापूर संस्थानमधील पारित ठराव, प्रशासकीय अहवाल, यातील काही दस्तऐवज मोडी लिपीत आहेत.
हे अहवाल प्रकाशित करण्याचा मानस सारथीचा असून, याचाच एक भाग म्हणून मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेअर उमेदवारांसाठी ही योजना आखण्यात आली आहे.
मराठा कुणबी समाज
मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेअर उमेदवारांसाठी ही योजना असणार आहे. यातून मराठा कुणबी समाज मोठा फायदा घेऊ शकते.