Lek ladki Yojna update : महाराष्ट्र शासनाकडून लेक लाडकी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनेक कुटुंबातील मुलींना फायदा होणार आहे. या योजनेतून सरकार आर्थिक मदत करते.
लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने मार्फत महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा हेतू मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम तसेच आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्याचबरोबर स्वतःच्या पायावर उभे राहता हा आहे.
लेक लाडकी या योजनेच्या माध्यमातून ज्या पालकांना फक्त मुली आहेत. अशा पालकांना आपल्या मुलीच्या नावाने सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे . यामुळे मुलींना आपल्या उच्च शिक्षणाचा खर्च, त्याचबरोबर दैनंदिन गरजेच्या पालनपोषणाचा येणारा खर्च स्वतः ला करता येईल. तसेच सामान्य जनतेला आपल्या खर्चासाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.
राज्यातील मुलींचे सक्षमीकरण व्हावे हाच उ्देश या लेक लाडकी योजना चा आहे. ही योजना आता नव्या स्वरूपात उपलब्ध झाली आहे.ही फक्त आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या तसेच फक्त पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील मुलींना मदत ठरेल. या योजनेअंतर्गत जन्म झाल्यानंतर मुलीला पाच हजार रुपये असे सरकार कडून अनुदान भेटत असते.
या योजने अंतर्गत मुलीला पहिलीत चार हजार रुपये सहावीत सहा हजार रुपये तसेच अकरावीत आठ हजार रुपये याप्रमाणे अनुदान मिळत राहते. ज्यावेळी मुलीचे अठरा वर्षे पूर्ण होईल तेव्हा सरकार कडून मुलीला 75 हजार रुपये असे अनुदान मिळेल.
या योजनेअंतर्गत एकूण चार टप्प्यात एकूण 98 हजार रुपये एवढी रक्कम अर्ज करणाऱ्या मुलींना आर्थिक सहाय्य म्हणून दिली जाणार आहे.
लेक लाडकी योजना या लाभासाठी आवश्यक अटी-
१.लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारी मुलगी ही महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावी. शिवाय तिचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला असावा.
२.अर्ज करणाऱ्या मुलीच्या परिवाराकडे पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड असायला हवे.ज्या मुलीच्या पालकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल अशा मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
लागणारी कागदपत्रे:
१.अर्ज करणाऱ्या मुलीचे आधार कार्ड
२.अर्ज करणाऱ्या मुलीचे किंवा तिच्या आई-वडिलांचे बँक पासबुक
३.उत्पन्नचे प्रमाणपत्र
४.रहिवासी दाखला
५.कुटुंबाचे केसरी किंवा पिवळे रेशन कार्डची झेरॉक्स
६.संपर्क इत्यादी