भगवानगडाच्या पायथ्याशी महिलेवर बिबट्याचा हल्ला,अपंग पतीमुळे…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- भगवानगड पायथ्याशी असलेल्या लमाण तांडा येथील छ्बुबाई एकनाथ राठोड (वय ४५) यांच्यावर शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.

या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर खरवंडी येथील दीपक रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. यावेळी अपंग पतीने बिबट्याला दगड मारून पत्नीला वाचविले असल्याचे सांगितले जात आहे याबाबत समजलेली माहिती अशी की, भगवानगड पायथ्याला लमाणतांडावरील छ्बुबाई एकनाथ राठोड या महिलेवर वाघाने अचानक हल्ला केला.

यावेळी छबुबाई यांच्याबरोबर अपंग पती एकनाथ दासू राठोड हे त्याच्यांबरोबर होते. पत्नीवर बिबट्या हल्ला करत असल्याचे त्यांच्या ध्यानात आल्याने त्यांनी दगड उचलत प्रतीकार केला तरी बिबट्याने त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर एक पंजा मारला आहे.

त्यामुळे त्या जखमी झाल्या माहीती मिळताच युवकानी त्यांना खरवंडी कासार येथील दिपक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले घटनेची माहीती मिळताच वनविभागाचे कर्मचारी पिजंरा घेऊन निघाले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24