पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले सुरुच; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील जांभुळवाडीसह बिरेवाडी परिसरात बिबट्याने चांगलेच थैमान घातले आहे. बिबट्याकडून बैल, गाय व मेंढीवर हल्ला चढवत त्यांना ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

यामध्ये तिन्ही पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, जांभुळवाडी परिसरातील कोळेकर वस्तीवर वास्तव्यास असणारे सखाराम आप्पा खेमनर यांच्या खिलारी बैलावर, हल्ला चढवला व त्याला ठार केले.

त्यानंतर बिबट्याने आपला मोर्चा बिरेवाडी परिसरात वळवला. तेथे धुमाकूळ घालत गोरक्षनाथ सागर यांची गाय तर शांताराम किसन ढेंबरे यांची मेंढी ठार केल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती वन विभागाला समजताच वनविभागाकडून तिन्ही घटनांचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वीही बिबट्याने परिसरात परिसरात धुमाकूळ घालत मोठे नुकसान केले आहे.

या वाढत्या घटनांमुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीती पसरली असून पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24