जिल्ह्यातील या तालुक्यात बिबट्याची दहशत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात बिबट्याच्या दहशतीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बिबट्याच्या या दहशतीमुळे नागरिकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव परिसरात बिबट्याची दहशत वाढली असुन बिबट्याचा बछड्यांसह रात्री मुक्तसंचार होत असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे.

हरेगाव परिसरात वाढलेल्या झाडेझुडपांमुळे बिबट्यासह चोरट्यांची धास्ती वाढली आहे.परिसरातील अनेक रस्त्यांच्या कडेला वाढलेली झाडेझुडपांची साफसफाई करुन

बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी हरेगाव येथील महिलांनी केली आहे.ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील अनावश्यक झाडेझुडपांची छाटणी करावी

तसेच बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याच्या मागणीचे महिलांच्या वतीने सरपंच आणि ग्रामसेवकांना देण्यात आले. यावेळी नंदा गायके, मंगल सातदिवे, शोभा शिरसाठ, सुनीता कसबे, सविता भनगडे, सुनीता फुलवर उपस्थित होत्या

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24