निर्यातबंदी मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडू – खासदार शरद पवार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातील निर्यातक्षम कांद्याला चांगली मागणी आहे. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे खात्रीशीर निर्यातदार म्हणून तयार झालेल्या भारताच्या प्रतिमेस धक्का बसेल,

असा इशारा देतानाच कांद्याची अचानक करण्यात आलेली निर्यातबंदी मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आमदार नीलेश लंके यांना दिली. दिल्लीत मंगळवारी आमदार लंके यांनी खासदार पवार यांची भेट घेऊन कांद्याच्या प्रश्नावर शिष्टाई करण्याची विनंती केली.

त्यावर पवार यांनी आपली यासंदर्भात सकाळीच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. खारे कर्जुने लष्करी सराव क्षेत्राच्या (के. के. रेंज) च्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी खासदार पवार यांच्या सूचनेनुसार आमदार लंके हे सध्या दिल्लीमध्ये आहेत. ते सोमवारी दिल्लीत पोहोचलेे.

त्याच वेळी केंद्राकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय जाहिर केला. त्यामुळे मंगळवारची भेट नियोजित नसतानाही आमदार लंके यांनी खासदार पवार यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेण्यास भाग पाडण्याचे साकडे घातले.

आमदार लंके यांनी भेट घेण्यापूर्वीच खासदार पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. स्वतः पवार यांनीच मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातील निर्यातक्षम कांद्याला चांगली मागणी आहे.

केंद्र सरकारच्या अशा अचानक निर्णयामुळे खात्रीशीर निर्यातदार म्हणून तयार झालेल्या भारताच्या प्रतिमेस धक्का बसणार असल्याचे गोयल यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे पवारांनी सांगितले. निर्यातबंदी घोषित झाल्यानंतर राज्यातील लोकप्रतिनिधींनी

आपणास फोन करून निर्यात बंदीच्या निर्णयावर फेरविचार करण्यास केंद्र सरकाला भाग पाडण्याची विनंती केली होती. त्यामुळे सकाळीच या प्रश्नावर आपण आपली भूमिका मंत्री गोयल यांच्यापुढे मांडली. जिरायत भागातील तसेच अल्पभूधारक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतो.

शेतकऱ्यांचे हित जोपासले गेले पाहिजे. या प्रश्नावर आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही पवार यांनी लंके यांना दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24