मंगल कार्यालय, मंडप, डेकोरेटर्स व केटरिंग असोसिएशनच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ – आदित्य ठाकरे.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  मंगल कार्यालये, केटरिंग, मंडप, डेकोरेटर्स अँड इव्हेंट व लग्न सोहळ्याशी संबंधीत सर्व संघटनाच्या मागण्यांचा सहानुभुतीपूर्वक विचार करून काही अटी व शर्थीच्या अधिन राहून व्यवसाय सुरू करण्यास लवकरात लवकर परवानगी देण्यात येईल असे आश्वासन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले,

असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी महापौर भगवान फूलसौंदर यांनी दिली. लग्न कार्यासाठी मंगल कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी ५00 लोकांना परवानगी द्यावी, यासह इतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना यापूर्वी मेलद्वारे पाठविण्यात आलेले आहे.

तथापी मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ च्या सुमारास माजी महापौर भगवान फुलसौंदर व नगर जिल्हा युवा सेना प्रमुख विक्रम राठोड यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी संघटनेच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केली.

आदित्य ठाकरे यांनी संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले व याबाबत मुखमंत्र्याशी चर्चा करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. नगरसेवक धनंजय जाधव, दत्ता जाधव, मदन आढाव, यांच्यासह राजेंद्र उदागे, चंद्रकांत फुलारी, सुरेश खरपुडे, इंद्रजित नय्यर, धनंजय शेटे, अतुल जाधव

आदी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या चर्चेमुळे मंडप,केटरिंग, लाईट, डेकोरेटर्स व मंगल कार्यालय मालक संघटनेच्या आशा पल्लवित झाल्या असून किमान ऑक्टोबर अखेर पर्येंत तरी रीतसर परवानगी मिळेल व येणाऱ्या लग्न सराईच्या ऑर्डर्स करता येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24