Live Update: ‘त्या’ जागी मंदिर होणारच ! मुस्लिम समाजाला दुसर्या ठिकाणी ५ एकर जागा मिळणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

या ऐतिहासिक खटल्याच्या निकालानंतर राम जन्मभूमी न्यास कार्यशाळा परिसरात कुठलंही सेलिब्रेशन होणार नाही : विश्व हिंदू परिषद

अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

सुन्नी वक्फ बोर्डाकडून निकालाचं स्वागत, संपूर्ण 2.77 जागा रामलल्लाचीच

आयोद्धेतील वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचा सुप्रिम कोर्टाचा निकाल. तेथे मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करून आराखडा सादर करावा. तसेच मुस्लिमांना पाच एक पर्यायी जागा देण्याचा आदेश, तीन महिन्यांत यासंबंधी निर्णय घेण्याचे सुप्रिम कोर्टाचा आदेश

वादग्रस्त जागा रामलल्लाला बहाल.ट्र्स्ट बनवून मंदिर बनवा.  मंदिर निर्माणासाठी नियम बनवा- सर्वोच्च न्यायालय

वादग्रस्त जागा रामलल्लाला बहाल, मंदिर निर्माणासाठी नियम बनवा, केंद्राला आदेश, मुस्लिमांना अयोध्येत वेगळी 5 एकर जमीन मिळणार – सुप्रीम कोर्ट

रामलल्लाचा दावा कोर्टाला मान्य । तर दुसरी कड़े सुन्नी बोर्डाला देखील 5 एकर जागा मिळनार । अखेर तिढा सुटला ।

राम मंदिर होणारच ! मुस्लिम समाजाला दुसर्या ठिकाणी ५ एकर जागा मिळणार

हिंदुंची श्रद्धा आणि विश्वास की भगवान रामाचा जन्म अयोध्येत झाला, हे निर्विवाद आहे: सर्वोच्च न्यायालय

खोदकामातील तथ्ये दुर्लक्षित करता येणार नाहीत, मोकळ्या जागेवर मशीद बांधली नव्हती – सुप्रीम कोर्ट

बाबरी मशीद रिकाम्या जागी बांधली नव्हती : सर्वोच्च न्यायालय

मीर बाकीनेच बाबरी मशीद बनवली होती, निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला, 1949 मध्ये दोन मूर्ती ठेवल्या, रामलल्लाला कोर्टाची कायदेशीर मान्यता

शिया वक्फ बोर्डानेही जमिनीवर दावा केला होता, मात्र त्यांची याचिका फेटाळली

मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे , न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण, आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचे न्यायालयाच्या आवारात आगमन

अयोध्येमध्ये तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात, हजारो पोलिसांसह 35 सीसीटीव्ही, 10 ड्रोन कॅमेरा

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल कुणाची जीत अथवा हार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर आपल्यातील सौहार्द कायम राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

अयोध्येतील राम मंदिर व बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात व जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे.

त्यामुळे शहरात रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. वादग्रस्त असलेल्या काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर, कार्यकावर, विघ्नसंतोषी लोकांवर पोलिस नजर ठेवून आहेत.

जिल्ह्यात सर्वत्र बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, शांतता समितीच्या बैठका घेऊन सूचना देण्यात येत आहेत; तसेच नगर शहर व उपनगरातील काही भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

अयोध्येला पोलीस छावणीचे स्वरूप

निकालाच्या पार्श्वभूमीवर देशातील संवेदनशील ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था

आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे खंडपीठ निकालवाचन सुरू करणार

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24