Gram Panchayat Election Results 2021 LIVE Updates : राज्यातील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्या. आज या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आहे. अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करा (LAST UPDATE On 9.23 AM)
नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे
जिल्ह्यातील एकूण 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यातील 53 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाली आहे.
अण्णा आणि पवारांना बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यात अपयश आल्याने या दोघांच्याही वर्चस्वासाठी यंदा मोठा धक्का बसलाय.