अहमदनगर Live24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित केले असून यावेळी महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे, राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम राखण्यात येणार आहे.
Live Updates –
- महाराष्ट्र राज्यात 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन डाऊन कायम राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत घोषणा
- मला राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा शून्यावर आणायचाय – उद्धव ठाकरे
- लॉकडाऊन किती वेळ चालणार हे आपल्या हातात आहे. आपण नियम पाळले व ही साखळी तोडली तर हा लॉकडाऊन लवकर संपेल
- जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच रहाणार – उद्धव ठाकरे
- वर्क फ्रॉम होम चालू करा
- किमान ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन सुरु ठेवावा लागणार
- १४ तारखेनंतर काही ठिकाणी बंधने शिथील होतील, ज्या ठिकाणी अधिक रुग्ण आहेत त्या ठिकाणी अधिक कडक बंधने होतील
- ही जी एकजूट मी पाहतोय ती कायम राहिली तर लवकरच आपण या संकटावर मात करू
- राजकारण पाचवीला पुजलेय पण आता यात मला राजकारण नकोय. पक्षीय राजकारण थांबली पाहिजे.
- सगळी राज्य सरकार केंद्र सरकार सोबत आहोत
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®