दहशत निर्माण करणार्‍या ईडी, सीबीआय संस्थांचे लॉकडाऊन करा.. वाचा सविस्तर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई – पंतप्रधान यांनी आत्मनिर्भरतेकडे चला असा संदेश दिला आहे. परंतु उद्योग सुरू करून लाखोंचे कर्ज बुडवून उद्योगपतीनी पळून जाणे हे आता भारताला परवडणारे नाही.

उद्योजक, व्यापारी यांना टिकवून ठेवावे लागणार आहे. याकरता दहशत निर्माण करणार्‍या ईडी, सीबीआयसारख्या ‘राजकीय’ संस्थांचे काही काळ ‘लॉक डाऊन’ करावे लागेल अशी मागणी सामना अग्रलेखातून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे.

तसेच लॉक डाऊन – 4 चे सुतोवाच करताना पंतप्रधानांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करूनही शेअर बाजाराच्या बैलाने साधे शेपूटही का हलवले नाही? याचा विचार केला तर एकच कारण दिसते ते म्हणजे भांडवलदार, गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत.

त्यांना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी विश्वास आणि अभय दिलेच पाहिजे असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

स्वातंत्र्यापूर्वी देशात एक ‘सुई’सुद्धा बनत नव्हती. स्वातंत्र्यानंतर पुढच्या साठ वर्षात हिंदुस्थान अनेक क्षेत्रांत आत्मनिर्भर झाला.

विज्ञान, तंत्रज्ञान, शेतीउद्योग, संरक्षण, उत्पादन, अणू विज्ञान यात तो झेपावला. आज पीपीई किटस् बनविणाऱ्या आयसीएमआरसारख्या विज्ञान संस्था याच आत्मनिर्भर हिंदुस्थानच्या भाग आहेत.

तेव्हा पंडित नेहरू होते, आज मोदी आहेत असेही शिवसेनेने म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24