अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात येत असताना महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊनमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
त्याचबरोबर अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने सरकारनं रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे.
राज्यात अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात अपेक्षेप्रमाणे रेस्टॉरंटचालक आणि डबेवाल्यांना दिलासा देण्यात आला आहे. त्याचवेळी रेल्वे प्रवासावर लक्ष केंद्रीत करताना महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. लोकल पूर्ववत कधी सुरू होणार हा प्रश्न कायम असला तरी त्या दिशेने महत्त्वाची पावले टाकली जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
राज्यात शाळा, कॉलेज, अन्य शैक्षणिक संस्था तसेच कोचिंग क्लासेस तूर्त बंदच राहतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, मॉलमधील थीएटर्स, ऑडिटोरियम, सभागृहे याबाबतही तूर्त कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.
मार्गदर्शन सूचना
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved