अहमदनगर :- लाॅकडाऊनच्या काळात परराज्यातील अनेक नागरिक अडकून पडले आहेत.या सर्व नागरिकांना राज्य शासनाने बसची व्यवस्था करून त्यांच्या घरी पोहोच केले पाहिजे,
असे मत खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी तहसील कार्यालयात मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव देशासह राज्यात मोठ्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केले आहे.
खासदार डॉ. सुजय विखे यांनी नुकतीच राहुरी येथील तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कशा प्रकारे उपाययोजना करता येतील.
तसेच वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. यासाठी कुठले पर्याय करता येतील, या बाबत चर्चा करून खासदार विखे यांनी राहुरीतील महसूल अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन महत्त्वाचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत घेतलेला लाॅकडाऊनचा निर्णय योग्य आहे. शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असेही खासदार डॉ. विखे यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®