महाराष्ट्र

Longest Bridge In India: महाराष्ट्रात आहे देशातील समुद्रावर बांधलेला सर्वात लांब पूल! स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा जास्त लागले आहे सिमेंट आणि स्टील

Published by
Ajay Patil

Longest Bridge In India:- संपूर्ण भारतामध्ये अनेक पायाभूत प्रकल्पांचे कामे सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असून यामध्ये रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत अनेक ठिकाणी मोठमोठे पूल तसेच बोगदे उभारण्यात येत आहे व या सगळ्यांमध्ये अत्याधुनिक  प्रकारचे उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने यातील अनेक प्रकल्प हे देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये अव्वल ठरताना आपल्याला दिसून येत आहेत.

या प्रकल्पांपैकीच आपण जर मुंबईत उभारण्यात आलेला मुंबई ट्रांस हार्बर लिंक या समुद्रावरील पुलाचा विचार केला तर हा समुद्रावर बांधण्यात आलेला देशातील सर्वात लांब पूल असून जगात असलेल्या सर्वात मजबूत पूलांमध्ये देखील याची गणना होते. या समुद्रीपुलाचे अनेक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे व त्यामध्ये एक वैशिष्ट्य पाहिले तर याचे वजन 2300 मॅट्रिक टन असून या पुलाच्या बांधकामांमध्ये तब्बल नऊ लाख 75 हजार घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आलेला आहे.

जर हे प्रमाण आपल्याला समजून घ्यायचे असेल तर अमेरिकेतील प्रसिद्ध असलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमध्ये जे स्टील आणि सिमेंट वापरण्यात आलेले आहे त्यापेक्षा हे 6 पट अधिक आहे. यावरून आपल्याला या पूलाची मजबुती किंवा महत्त्व समजते.

 कशा पद्धतीने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आहे महत्वाचा?

1- मुंबई ट्रान्स हार्बर लींकला अटल सेतू म्हणून देखील ओळखले जात असून यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांचे उद्घाटन करण्यात आलेले होते.

2- हा 21.8 किलोमीटर लांबीचा पूल मुंबईतील शिवडीला रायगड जिल्ह्यातील न्हावा-सेवाशी कनेक्ट करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो. या पुलावरून सध्याचा प्रवास वेळ 60 मिनिटा वरून पंधरा ते वीस मिनिटांवर आलेला आहे.

3- मुंबई ट्रांसफार्मर लिंक हा ओआरटी प्रणालीचा म्हणजेच ओपन रोड टोलिंग प्रणाली असलेला भारतातील पहिला सागरी पूल आहे व या ठिकाणी वाहने टोल बूथ वर न थांबता शंभर किमी प्रतितास वेगाने जातात. या समुद्र पुलावरून मोटर बाईक तसेच ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर आणि इतर हळू चालणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आलेली आहे.

4- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा 6 लेन असलेला पूल किंवा रस्ता असून ज्यापैकी 16.50 किमी समुद्रावर आहे तर 5.50 किलोमीटर जमिनीवर आहे. भारतीय इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना म्हणून या पुलाकडे बघितले जाते.

5- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक उभारण्याकरिता 18000 कोटी रुपयांचा खर्च आला असून यावरून सतरा हजार वाहने ये-जा करतात व त्यामुळे बराचसा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत झालेली आहे.

6- मुंबई ट्रांस हार्बर लिंक मुख्यत्वे करून मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गाला कनेक्ट करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे व या पुलामुळे महाराष्ट्रातील दोन मोठे शहरांमधील संपर्क आणखी वाढणार आहे.

Ajay Patil